Saturday, January 02, 2010

निसर्गराजा!

माझा मित्रा पश्या हे एक महान व्यक्तिमत्व आहे पण ते एक जगा-वेगळ रसायन आहे. तो खरा खुलतो ते निसर्गाच्या सान्निध्यात. ते म्हणतात ना, मनाची शांति वगैरे काय ते, ते मिळत त्याला जेव्हा तो दर्या-खोर्‍यातून फिरत असतो तेव्हा. गेल्या ३-४ वर्षं मध्ये त्यान मुंबई पुण्याच्या आस-पासच्या बहुतांश सगळ्याच गड-किल्ल्यांना भेटी दिल्या असतील. खरतर भेट दिली असेल असा म्हणन चुक ठरेल, त्यानी त्या गड-किल्ल्यांचा अभ्यास केला असेल (बरोबर आहे अभ्यास करण आणि खूप मार्क्स मिळवणा हा देखील त्याचा एक छंद) मला अस वाटत की आयुष्यात काय करायचा हे जानन तितकाच महत्वाच आहे जितक की पृथ्वीतलावर जन्म घेण (ही गोष्ट इतकी महत्वाची असूनही हजारात एखादाच जाणतो). बहुतेक ही अनुभूती व्हायला जीवनाच सर्वांगी दर्शन होणा गरजेचा आहे. पश्यान खूप काही पाहिलाय आन तेच कारण असणार की त्याला काय हव आहे, काय करायाच आहे ते तो जाणतो. मोजक्या शब्दात जर त्याच वर्णन करायचा झाल तर 'एक अष्टपैलू व्यक्तिमत्व' हे अतिशय चपखल बसत मी पाहिलेला एकमेवाद्वितीय अष्टपैलू व्यक्ती. तुम्हा असा यूनिवर्सिटी टॉपर शोधून सापडणार नाही जो दर्या-खोर्‍यांनी, गड-किल्ल्यानी फिरतो, जो उत्तम रेखचित्रे काढतो. ह्यास शाडूची माती द्या, तो एखादी सुंदर मूर्ती बनवेल, ह्याच्या हातात कॅमेरा द्या, तुम्ही पाहत राहाल असे फोटोस मिळतील, पक्षी विषयकही तेवढीच माहिती. खेळ आणि खेळाडूंच्या बाबतीत तसेच सिनेमाच्या बाबतीतही एग्ज़ॅक्ट इन्फर्मेशन असते. एकंदर असा प्राणी पुन्हा घडणे नाही. जे ह्याच्या सहवासात आले ते पावन झाले, अन् त्यातलाच मी एक. लवकरच पुढचा भाग.....

No comments: