Monday, November 23, 2009

विनाशकाले विपरीत बुद्धी

संजय राउत यांना माझा एक प्रश्न, त्यांना त्यांच्या रडवेल्या मुलाच्या चेहर्यावर तरी हसू आणता येत का? सचिन तेंडुलकरबद्दल तुम्ही काही बोलावा इतकी तुमची लायकी तरी आहे का? अहो त्या माणसाच जेवढ़ कर्तृत्व आहे, तेवढ ना ही तुमच्या लेखनिच अन ना ही तुमच्या राजकारणाच. त्याचा एक फटकार (षटकारही नाही) रडनारया पोराला शांत करतो अन भांडनारया शेजारयाला चुप करतो.

गेली ४-५ वर्षे भारतात अन भारताबाहेर फिरण्याचा काही वेळा योग आला. मग तो भारतीय असो, बांगलादेशी असो वा पाकिस्तानी असो, तो केवळ दोनच गोष्टीबद्दल विचारतो. एक ती लता आणि दुसरा सचिन. आपण कृपया समजून घ्यावे ह्यांच्यात दुभगलेली मना जोडण्याचे सामर्थ्या आहे अन्यथा आपले इस्राएल- पॅलेस्टाईन व्हायला जास्त वेळ नाही लागणार.

तुम्ही सध्या जी सचिनवर चिखलफेक चालवली आहे ना त्यात तुम्हीच घाण होताय हे तुम्ही बहुधा जाणत नाही. बर्‍याचश्या मराठी माणसांत एक दुर्गुन आढळून येतो, दुसर्याला कुणी चांगल म्हणाला तर ह्याला पोटात दुखत अन् ह्या समजाला मांजरेकर, कांबळी अन् तुमच्यासारखे लोक खात-पाणीच घालतात.

मला खरच तुम्हा सांगाव वाटत की राष्ट्र-भावना फार महत्वाची आहे, अन्यथा एकसंध भारत आणि तुकड्या-तुकड्यातला युरोप ह्यात फारसा फरक नाही. तुमच्यासारखे मनानी आणि विचाराणी कोडगे लोक कधीच राष्ट्रभक्त असु शकत नाहीत. तुम्ही म्हणता की तेलुगू असे करतात, तमिळ तसे करतात तर मग आपण मराठीच का बर तसे वागू नये, अहो एक समजून घ्या की हा सर्व भारतवर्ष 'हिंदू' ह्या एका नाळेन जोडलेला आहे. तुम्हाला जर राजकारणच करायचा असेल तर समस्त हिंदूंना एकटरा बांधण्याच करा, ना की त्यात भेदभाव अन् दुरावा निर्माण करण्याच.

पण मला असा वाटत की, सचिन हे एक निमित्त्य आहे. राज ठाकरेंनी तुमच्या धनुष्या-बाणाचा प्रत्यन्चा पळवलाय अन् तुम्ही सर्वेतोपरि प्रयत्न करताय की प्रत्यन्चा नाही तर नाही सुतळी तरी लावता येईल काय. तुम्ही जाणता की सचिन हा राज चा मित्र, त्याला छेडल्यास राज डीवचेल अन् काही तरी प्रतिक्रिया देईल. मग काय करा भांडवल त्याच. मी काय बोलतोय ते समजून घ्या, तुम्ही निवडलेला मार्ग चुकीचा आहे किंबहूना असे म्हणणे सयुक्तिक ठरेल की तुम्ही पायावर कुरहाड मारुन घेतली आहे अन् ह्याचा परिणाम तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेलच. हे सांगण्यास कुणा ज्योतिषाची वा राजकीय विश्लेषकाची गरज नाही.

एक मात्र समजलय, शिव-सेने वरुन आता ठाकरेंचा कंट्रोल संपलाय अन् तुमचा सुरू झालाय.
..... एक सच्चा भारतीय
..... एक अभिमानी महाराष्ट्रिय
..... एक कडवा हिंदू

No comments: